Useful Information

Pages

Saturday, January 13, 2018

आयकर फॉर्म सन २०१७-१८

*आयकर फॉर्म सन २०१७-१८ फॉर्म भरण्यासंबंधी सुचना* –

*१.महिलांनी नाव बदलले असेल तरीही फॉर्मवर वडीलांचेच नाव लिहावे.*

*२.फॉर्मवरील सर्व माहिती पुर्णपणे खात्री करूनच भरणे, अपूर्ण ठेवू नये किंवा चुकीची भरू नये .*

*३.जन्मतारीख पॅन वर आहे तीच लिहणे,बँक खाते नं.पूर्ण 15 अंकी व IFSC कोड लिहणे.*

*४.टॅक्स नियमांच्या नवीन बदलानुसार प्रत्येकाचा Email id असणे गरजेचे आहे तसेच मोबाईल नबंर चालू असलेला लिहणे या दोन्हीवर यावेळी OTP येणार आहेत*

*५.माहे फेब्रुवारी मध्ये तुम्हाला हा फॉर्म व वजावटीची सर्व कागदपत्रे तुमच्या ऑफिसला केद्रप्रमुखांमार्फत सादर करायची आहेत तरी त्यामुळे या भरलेल्या फॉर्मची झेरॉक्स काढून ठेवणे, परत झेरॉक्स किंवा व्हाट्स एप वर फोटो मिळणार नाही. त्यासाठी अशीच दुसरी प्रत आताच तयार करून ठेवणे.*

*६. वजावटीचे पुरावे असतील तरच कपातीसाठी रकमा लिहाव्यात अन्यथा लिहू नये , गृहीत धरले जाणार नाही.*

*गुंतवणूक वजावट संदर्भात सुचना-*

*१.स्टॅम्प फी ही घर खरेदी साठीची असावी .*

*२.FD ही ५ वर्षावरील मुदतीसाठी असावी.*

*३.देणगी पावतीवर दिलेल्या संस्थेचा पॅन नंबर व आयकर सवलत नमूद असणे आवश्यक आहे.*

*४.मॅचअल फंड हा टॅक्स सेवर च असावा .*

*५.ट्यूशन फी पावतीवरील शिक्षण फी म्हणून दिलेलीच फी ग्राह्य धरली जाईल इतर बाबींसाठी दिलेली फी धरू नये . तसेच सदर पावती फक्त मुलांची तीही फक्त शाळा महाविद्यालये यांचीच चालेल, क्लासची नाही.*

*६.LIC पावत्या १एप्रिल १७ ते ३१ मार्च १८ या कालावधीतीलच असाव्यात, संदर्भासाठी जुन्या पावत्या जोडू नयेत.*

*७.घरभाडे सवलत हवी असेल तर करारनामा जोडणे आवश्यक .गृहकर्ज असेल तर घरभाडे सवलत मिळणार नाही.*

*८.फॉर्मसोबत वजावटीच्या सर्व पावत्या या १एप्रिल १७ ते ३१ मार्च १८ या कालावधीतीलच असाव्यात, संदर्भासाठी कोणत्याही जुन्या पावत्या जोडू नयेत. फॉर्मसोबत जेवढे पुरावे जोडलेत ते तपासून तेवढीच वजावट केली जाईल, नंतर मिळणार्‍या पावत्या रिटर्न फाइल करताना गृहीत धरून त्याचा होणारा टॅक्स रिफंड मध्ये घेतला जाईल. मागील वर्षाच्या डिमांड नोटिस नसतील तर रिफंड जून १८ मध्ये १००% जमा होईल. नोटिस असेल तर त्याबद्दल खात्री नाही.*

*आयकर कपात २०१७-१८  : २.५ लाख पर्यंत Nill,*
*२.५ ते ५ लाख पर्यंत ५% टॅक्स,*
*५ लाख ते १० लाख पर्यंत २०% टॅक्स*

*१० लाखाच्या वर ३०% टॅक्स.*

 *Rebate-करपात्र उत्पन्न जर ३.५ पर्यंत असेल तर रु.२५०० Rebate मिळेल.*
*दिव्यांग व्यक्ती साठी 75000/- अधिक सुट मीळते*

No comments:

Post a Comment